|Monday, November 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सोनीपत बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवादी टुंडा दोषी

सोनीपत बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवादी टुंडा दोषी 

सोनीपत :

1996 मध्ये सोनीपत येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी दहशतवादी अब्दुल करीम टुंडा दोषी ठरला. सोनीपतचे न्यायालय टुंडाला होणाऱया शिक्षेची घोषणा मंगळवारी करणार आहे. 28 डिसेंबर 1996 रोजी सोनीपतमध्ये झालेल्या 2 बॉम्बस्फोटांमध्ये 12 पेक्षा अधिक जण जखमी झाले. उत्तरप्रदेशच्या गाजियाबाद जिल्हय़ाचा रहिवासी असणाऱया टुंडाला 2013 मध्ये नेपाळ सीमेवर अटक झाली. उत्तरप्रदेश, दिल्ली, मुंबई, हरियाणा, पंजाब, हैदराबाद आणि सुरतमध्ये झालेल्या एकूण 43 बॉम्बस्फोटांमध्ये टुंडाचा हात होता. या स्फोटांमुळे 20 जणांना जीव गमवावा लागला तर 400 पेक्षा अधिक जण जखमी झाले. जम्मू-काश्मीर बाहेरील लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी कारवायांमध्ये टुंडा सामील होता.  दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यअगोदर 1980 च्या दशकात तो औषधांचे दुकान चालवायचा. बॉम्बनिर्मितीत त्याने प्राविण्य मिळविले होते.

Related posts: