|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरज-पंढरपूर रोडवर अपघातात एक ठार

मिरज-पंढरपूर रोडवर अपघातात एक ठार 

वार्ताहर/ ढालगाव

मिरज-पंढरपूर राज्य महामार्गावर मोटारसायकाल व एस.टी. बस यांची धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण ठार तर एक गंभीर जखमी झाला. याबाब माहिती अशी, काशिलिंग चंद्रकांत खटाळे वय 32 रा. ढालगाव व भगवान शंकर कोळेकर रा. आरेवाडी हे दोघेजण सीडी डिलक्स एमएच 10 जीए 2255 या मोटारसायकलवरून मिरजकडे घरगुती कामानिमित्त निघाले होते. कुची व लांडगेवाडी यांच्या दरम्यान असणाऱया महाराजा ढाब्याच्याजवळ मोटारसायकलच्या आडवे कुत्रे आले. त्याला चुकवण्याच्या नादात कुत्र्याला धडकडून ते खाली पडले. याच वेळी पाठीमागून येणारी बार्शी-मालवण एस.टी. बस डी.एमएच. 06-9522 येत होती. मोटारसायकल स्वार पडल्याचे पाहून एसटी बसने ब्रेक मारण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र बस फरपट जावून मोटर सायकलस्वार यांच्या खुटाळे जागीच ठार झाले. तर भगवान शंकर कोळेकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे.

Related posts: