|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त चौगुले निलंबित

समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त चौगुले निलंबित 

सोलापूर / वार्ताहर

वेगवेगळ्या गैरप्रकारात विभागीय चौकशी सुरू झाल्यामुळे सोलापूरचे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त नागनाथ चौगुले यांच्यावर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.

 याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागनाथ चौगुले हे समाज कल्याण विभागात सोलापुरात सहाय्यक आयुक्त कार्यरत असून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱयांकडून चौकशी करण्यात येत होती. कामातील अनियमितता यासह विविध कारणांचा ठपका ठेवत समाज कल्याण सचिवांनी चौगुले यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. कारवाईचा हा आदेश त्यांनी नुकताच बजावला आहे. 

  दरम्यान, याप्रकरणी नागनाथ चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले मला अद्याप शासनाकडून किंवा वरिष्ठाकडून कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही. मी प्रामाणिकपणे काम करीत असून विनाकारण माझ्या मागे चौकशीचा भुंगा लावला आहे. मी पारदर्शकपणे काम करीत असताना आपणास दोषी ठरविणे अयोग्य ठरेल.

Related posts: