सोनहिरा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी
वार्ताहर/ वांगी
ढगांची गडगड आणि विजेच्या कडकडाटांसह सोनहिरा खोयात सोनसळ ,शिरसगाव,सोनकीरे, चिंचणी ,पाडळी वाजेगाव येथे सोनहिरा तालावाच्या पाणलोट क्षेत्रासह सोनहिरा खोयात आज सोमवारी सायंकाळी 5 ते 6 च्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अचानक आलेल्या पावसामुळे पादचारी व दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली.
सोनहिरा खोयात गेल्या चार दिवसांपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज सायंकाळी मात्र जोरदार पाऊस झाला.. सायंकाळी 4 वाजल्यानंतर ढग दाटून आले. सुरुवातीच्या तुरळक सरींनी अचानक जोर धरल्याने अवघ्या काही मिनिटांत रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. दीपावली जवळ असल्याने अनेक जण विरंगुळा व खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. पावसामुळे मात्र त्यांची गैरसोय झाली. काहींनी रस्त्याच्या कडेला असणाया घरांचा एस टी बस थांब्याचा आसरा घेतला, तर काहींना पर्याय नसल्याने पावसाचा मारा सहन करावा लागला. रस्त्याने जाणार्या दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून त्यांनी झाडांचा आसरा घेतला. अनेक ठिकाणी पावसाचे साचले होते. पावसामुळे पाणीही रस्त्यावर आले होते. सखल भागात चिखलाचा सामना नागरिकांना करावा लागला. खड्डय़ांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांनाही त्यांचा अंदाज येत नव्हता. मोठय़ा प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्याने सोनहिरा ओढय़ातून पुराचे आणि चिंचणी तलावात आले.तलावाचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतील आणि 153 दशलक्ष घनफुट क्षमतेच्या या तलावातून पाण्याचा मोठा विसर्ग होईल या भीतीने तलावाचे 3 दरवाजे चार फुटाणे उचलण्याचा निर्णय देशभक्त शामराव मास्तर पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी घेतला आणि दोन दरवाजे 4 फुटाणे उघडले आहेत.