|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » leadingnews » गोरखपूरमध्ये 24 तासांत 16 बालकांचा मृत्यू

गोरखपूरमध्ये 24 तासांत 16 बालकांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / गोरखपूर 

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बाबा राघव दास रूग्णालयात गेल्या 24 तासांमध्ये 16 बालकांचा मृत्यू झाला आहे. रूग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या 16 बालकांपैकी 10 बालकांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. तर उर्वरित 6 बालकांना आयसीमध्ये दाखल करण्यात आले.

मेंदूशी संबंधीत आजारांमुळे आतापर्यंत गोरखपूर आणि शेजारिल भागांमध्ये अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 16 बालकांनी जीव गमवल्यामुळे बाबा राघव दास रूग्णालयात मृत पावलेल्या बालकांची संख्या 310 वर पोहोचली आहे. याशिवाय गेल्या 24 तासांमध्ये 16 बालकांनी जीव गमवल्यामुळे बाब राघव दास रूग्णालयात मृत पावलेल्या बालकांची संख्या 310 वर पाहोचली आहे. याशिवाय गेल्या 24 तासांमध्ये बाबा राघव दास रूग्णालयात 20 बालकांना उपचारांसाठी दाखल करून घेण्यात आले आहे. यामध्ये देवरियातील 6, खुशीनगरमधील 2, गोरखपूर आणि महाराजगंज येथील प्रत्येकी 4 बस्ती आणि बलरामपूर येथील प्रत्येकी एका बालकाचा समावेश आहे.

 

Related posts: