|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » पेप्सिको इंडियाच्या सीईओंचा राजीनामा

पेप्सिको इंडियाच्या सीईओंचा राजीनामा 

नवी दिल्ली

पेप्सिको इंडिया होल्डिंग्सचे प्रमुख आणि सीईओ डी. शिवशंकर यांनी पदाचा राजीनामा दिला. ते आता आदित्य बिर्ला समूहातील व्यवसाय रणनिती आणि विकास विभागाचे प्रमुखपद सांभाळतील. शिवशंकर हे थेट समूहाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांना अहवाल सादर करतील. शिवशंकर यांच्यानंतर उपाध्यक्ष आणि इजिप्त, जॉर्डनचे महाव्यवस्थापक अहमद एल शेख हे पदाची जबाबदारी स्वीकारतील. शेख हे 1 नोव्हेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत हे पद सांभाळतील.

फेसबुक इंडिया आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक उमंग बेदी हे पदावरून पायउतार झाले. अडोब इंडियातील पदाचा राजीनामा देत ते  जुलै 2016 मध्ये फेसबुकमध्ये सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरकर्त्यांच्या बाबतीत भारत फेसबुकची दुसऱया क्रमांकाची बाजारपेठ आहे. सध्या कंपनीचे देशात प्रतिमहिना 201 दशलक्ष सक्रीय वापरकर्ते आहेत.