|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » व्हिनसची विजयी सलामी

व्हिनसची विजयी सलामी 

वृत्तसंस्था/ हाँगकाँग

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या हाँगकाँग खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या 37 वर्षीय व्हिनस विलियम्सने विजयी सलामी दिली. पहिल्या फेरीतील सामन्यात पाचव्या मानांकित व्हिनसने केवळ 74 मिनिटात जपानच्या रिसा ओझाकीचा 6-2, 6-2 असा पराभव केला.

पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात जपानच्या ओसाकाने चिलीच्या ग्युराचीवर 7-5, 6-4 अशी मात केली. व्हिनस आणि ओसाका यांच्यात दुसऱया फेरीचा सामना होईल. थायलंडच्या कुमकुमने रशियाच्या 19 व्या मानांकित व्हेस्निनाचा पहिल्याच फेरीत 6-3, 6-4 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या गॅव्हेरीलोव्हाने जपानच्या केटोवर 6-1. 7-6 (7-4) अशी मात करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.