|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महसूल कर्मचाऱयांचे काम बंद आंदोलन

महसूल कर्मचाऱयांचे काम बंद आंदोलन 

प्रतिनिधी/ आजरा

पुरवठा विभागाकडील निरिक्षक हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिवाय महसूल विभागाकडे जमा होणारा करमणूक कर सेल्सटॅक्स विभागाकडे वर्ग करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. यामुळे महसूल विभागाकडील कर्मचाऱयांवर अन्याय होण्याबरोबरच महसूल विभागाकडून मिळणाऱया उत्पन्नात घट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महसूल कर्मचाऱयांनी छेडलेल्या काम बंद आंदोलनात आजरा महसूल कर्मचारी सहभागी झाले.

आजरा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या बंदमध्ये सहभागी झाल्याने मंगळवारी तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट जाणवत होता. याबाबत निवासी नायब तहसीलदार डी. डी. कोळी यांच्याशी संपर्क साधला असता आमच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

Related posts: