|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ओढय़ावरील पुलाला पडले भगदाड

ओढय़ावरील पुलाला पडले भगदाड 

वार्ताहर/ लोणंद

कोपर्डे ता खंडाळा गावच्या हद्दीमध्ये कोपर्डे बसस्थानक ते कोपर्डे गाव रस्त्या दरम्यानच्या ओढयावर असणारा पुलावरून सोमवारी मोठया प्रमाणात पाणी वाहिल्याने पाण्याच्या दाबामुळे कोपर्डे ओढयावरील पुलाला भगदाड पडले असुन हा पुल अवजड वाहतुकीस धोकादायक बनला असुन संबधीतानी तातडीने या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थामधुन होत आहे,

कोपर्डे परिसरामध्ये सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे कोपर्डे  गावालगत असणाया ओढयाला महापुर आला होता, या पाण्यामुळे काही वेळ गावाचा संपर्क देखील तुटला होता, ओढयाला अचानक आलेल्या मोठया प्रमाणातील पाण्याने व पुलावरुन वाहणाया पाण्याच्या दाबामुळे कोपर्डे बसस्थानक ते कोपर्डे गाव रस्त्या दरम्यानच्या ओढयावर असणारा पुलाला भगदाड पडले असुन हा पुल अवजड वाहतुकीस धोकादायक बनला आहे, मंगळवारी बांधकाम विभागाच्या अधिकायानी या पुलाची पाहणी करून या पुलाची तात्पुरती मलमपट्टी केली आहे,मात्र संबधीतानी तातडीने या पुलाची पक्की दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थामधुन होत आहे, दरम्यान सोमवारी कोपर्डे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असुन या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Related posts: