|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » Top News » 12 आक्टोबर पासून सागर व्याख्यान परिषेद

12 आक्टोबर पासून सागर व्याख्यान परिषेद 

प्रतिनिधी/ पणजी

फोरम फॉर इंटरग्रेटेट नॅशनल सेक्यूरीटी (फिन्स) तर्फे बेतुल केळशी येथील लिला गोवा हॉटेल मध्ये 12 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत सागर व्यख्यान परिषेद 2017 होणार आहे. अशी माहिती फिन्सचे उपाध्यक्ष डॉ. प्रभाकरन परेली यांनी दिली. या परिषदेत जगभरातील एकूण 22 देशातीन मान्यवर सहभागी होणार असून सागरी सुरक्षेतेबाबत ते आपले विचार मांडतील असेही ते म्हणाले.

काल मंगळवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत फिन्सचे अध्यक्ष माजी ले.जनरल डी. बी. शेखटकर, माजी ले.जनरल व्ही एम पाटील. उपस्थित होते. 12 रोजी 4.30 वाजल्यापासून परिषदेतला सुरुवात होणार आहे. परिषदेच्या उद्घाट कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीयमंत्री एम.जे.अखबर तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व इतर मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. अशी माहिती परेली यांनी दिली आहे.

13 रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे,  उपस्थित रहाणार आहेत. दुसऱया दिवसाच्या पहिल्या सत्रात सागरी व्यावसाय आणि सागरी मार्ग या विषयावर कृष्णा बी. कोटक, डॉ. प्रियदरशी दाश व जॅन पॅड्रीक व पॅप्टन संजय प्राशार आपले विचार मांडतील यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थान भुषतील.

12 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत होणाऱया या परिषदेत विविध देशीतील प्रतिनीधी आपले विचार मांडतील या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू व राजेंद्र शेखावतही उपस्थित रहाणार आहेत.