|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » अल्पवयीन पत्नीसोबत शारीरीक संबंध म्हणजे बलात्काराच : सुप्रिम कोर्ट

अल्पवयीन पत्नीसोबत शारीरीक संबंध म्हणजे बलात्काराच : सुप्रिम कोर्ट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अल्पवयीन पत्नीसोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच असल्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला आहे. सज्ञान नसलेल्या पत्नीसोबत पतीने ठेवलेले शारीरीक संबंध हो रेपच असल्याचे सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे.

सुप्रिम कोर्टाने भारतीय दंड विधान कलम 375मध्ये दिलेला अपवाद रद्द केला आहे. कलम 375मध्ये 15 ते 18 वर्ष वयाच्या पत्नीसोबत पतीचे शरीरीक संबध बलात्कारच्या कक्षेतुन बाहेर ठेवले आहेत. परंतु आता हा अपवाद रद्द कण्यात आला आहे.

दरम्यान , अशा प्रकरणात तक्रार करण्याचा अधिकार कोणाला असेल हे अद्याप स्पष्ट नाही. पती-पत्नीमधीव शारीरीक संबंधसाठी सहमतीचे वय वाढवण्यात यावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु केंद्र सरकार या याचिकेवर विरोधात होते याचिकेला उत्तर देताना सरकारने म्हटले होते की, भारतात बालविवाह एक सत्य आहे आणि विवाहसंस्थेचे रक्षण व्हायला हवे.