|Sunday, July 22, 2018
You are here: Home » Automobiles » Honda CBR 650 F लाँच

Honda CBR 650 F लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जपानची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी होंडाने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी लोकप्रिय स्पोर्टस् बाइक CBR 650F चे 2017 मॉडेल भारतामध्ये लाँच केली आहे. या बाइकमध्ये अत्याधुनिक असे विशेष फिचर्स देण्यात आले आहेत.

– असे असतील या बाइकचे फिचर्स –

– इंजिन – या बाइकमध्ये 4 सिलिंडर इंजिन देण्यात आले असून, या इंजिनच्या माध्यमातून रायडरला सर्वोत्त्कृष्ट बाइक रायडिंगचा अनुभव मिळणार आहे.

– इंजिन कॅपॅसिटी – या बाइकमध्ये 649 सीसीचे इनलाईन 4 सिलिंडर लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले असून, 85.42 बीएचपीची पॉवर आणि 60.4 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता यामध्ये असणार आहे.

– गिअरबॉक्स – 6 स्पीड गिअरबॉक्स

– ब्रेकिंग सिस्टिम – 320 एमएमचा पंट डिस्क आणि रिअरमध्ये 240 एमएमचा डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

– या स्पोर्टस् बाइकच्या प्रंटला 41mm SDBV प्रंट फोक्स देण्यात आले असून, वाहन चालवताना पकड करताना मदत होऊ शकते.

– 7 स्टेप अडजस्टेबल मोनो शॉक देण्यात आले आहे.

– किंमत – 7 लाख 3 हजार रुपये

Related posts: