|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » Top News » एफटीआयआयमध्ये आता ‘अनुपम’ पर्व

एफटीआयआयमध्ये आता ‘अनुपम’ पर्व 

ऑनलाईन टीम / पुणे :

अभिनेते अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गजेंद्र चौहान यांच्या जागी अनुपम खेर यांची निवड झाल्याची माहिती मिळाली आहे.

दोन वर्षांपूर्वी गजेंद्र चौहान यांची एफीटीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून एफटीआयमध्ये वाद झाला होता. 141 दिवस विद्यार्थ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, त्यानंतर हा वाद निवळला होता. मागच्या काही दिवसांअखेर गजेंद्र चौहान यांच्या जागी अन्य कलाकाराची या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर अनुपम खेर यांची या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

अनुपम खेर हे मोदींचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नी किरण खेर या भाजपच्या खासदार आहेत. गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून वाद पेटला असताना अनुपम खेर यांनी सरकारची बाजू लावून धरली होती. त्याचे फळ म्हणून खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची चर्चा आहे. खेर हे एक सकस अभिनेते असून, त्यांनी कर्मा, हम आपके है कौन, सारांश यांसह विविध चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. डॅडी या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 

Related posts: