|Sunday, July 22, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » पेट्रोल पंपावर तुम्हाला किती अधिकार मिळतात माहित आहे का ?

पेट्रोल पंपावर तुम्हाला किती अधिकार मिळतात माहित आहे का ? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशभरात लाखो लोक पेट्रोल आणि डिझेलची खरेदी करतात. परंतु पेट्रोल पंपावर मिळणाऱया अधिकारांबाबत खूप कमी लोकांना माहीत आहे. आज तुम्हाला मिळणाऱया अधिकारांबाबत सांगणार आहोत.

  • पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेल खरेदी करणाऱयांच्या गाडीत मोफत हवा भरण्याची व्यवस्था करणे पंपाची जबाबदारी आहे. यासाठी कोणाताही चार्ज द्यावा लागत नाही.
  • पंपावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे.
  • शौचलय करणे ही पंपाची जबाबदारी आहे. यासाठी ग्राहकांकडून कोणाताही चार्ज घेता येत नाही.
  • अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीसाठी प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे.
  • जर चिटींग झाली तर तुम्हाला तक्रार करण्याचा अधिकार आहे. यासाठी पंपावर कम्पलेंट वही किंवा बॉक्स असणे गरजेचे आहे.
  • ग्राहकांना पेट्रोलची किंमत जाणून घेण्याचा अधिकार आहे.
  • पेट्रोलची खरेदी केल्यावर बिल मागण्याचा अधिकार ग्राहकांना आहे., जर काही धोका झाला तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता
  • इर्मजन्सी परिस्थिती ग्राहकांना एक फोन कॉल करण्याचा अधिकार आहे.

 

Related posts: