|Sunday, July 22, 2018
You are here: Home » Top News » नांदेड मनपासाठी 60 ते 65 टक्क्यांवर मतदान

नांदेड मनपासाठी 60 ते 65 टक्क्यांवर मतदान 

नांदेड / प्रतिनिधी :
नांदेडमध्ये महापालिकेच्या 20 प्रभागातील 81 जागांसाठी बुधवारी सुमारे 60 ते 65 टक्क्यांवर मतदान झाले. या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
येथील 81 जागांसाठी 578 उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य बुधवारी मतदानयंत्रात बंद झाले. सकाळी मतदानाला उत्साहाला सुरुवात झाली. दुपारी साडेतीनपर्यंत 46 टक्क्यांवर मतदान झाले. सायंकाळपर्यंत एकूण सुमारे 60 ते 65 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
नांदेड महापालिकेवर अशोक चव्हाण यांचे वर्चस्व आहे. मात्र, चव्हाण यांच्या गडाला सुरूंग लावण्यासाठी येथे भाजपाने मोठी ताकद लावली आहे. एकूण 20 पैकी 19 प्रभाग चार सदस्यीय आहेत. एक प्रभाग पाच सदस्यांचा आहे. एकूण 3 लाख 96 हजार 872 मतदार आहेत. गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related posts: