|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गनगरीतील जलतरण पटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सिंधुदुर्गनगरीतील जलतरण पटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड 

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी : 

इचलकरंजी येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी येथील जलतरणपटूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. त्यांची पुणे येथे होणाऱया राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

17 वर्षाखालील मुलींमध्ये श्रावणी उल्हास पालव (डॉन बॉस्को स्कूल ओरोस) 200 मीटर बेस स्ट्रोक द्वितीय, 19 वर्षाखालील मुलीमध्ये अक्षया लिंगवत (पणदूर हायस्कूल) 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर बॅक स्ट्रोकमध्ये द्वितीय. 14 वर्षा खालील मुलामध्ये भाग्येश पालव (डॉन बॉस्को स्कूल ओरोस) 200 मीटर आयएममध्ये द्वितीय. तसेच इंद्रनील वराडकर, गायत्री वायंगणकर, दर्शन आंगणे यांचाही या स्पर्धेत सहभाग होता.

 पुणे-बालेवाडी येथे 26 ऑक्टोबरला राज्यस्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी विजेत्या खेळाडूंची निवड झाली आहे. खेळाडूंना प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा विभागामार्फत खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले आहे.  

Related posts: