|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेल बंद

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेल बंद 

प्रतिनिधी / कणकवली :

एक देश एक इंधनाचा दर अंमलात आणा, यासह प्रमुख चार मागण्यांसाठी देशभरातील सरकारी तेल कंपन्यांचे तीन संघटनांच्या नेतृत्वाखाली असलेले 54 हजार पेट्रोलपंप 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेल खरेदी-विक्री बंद आंदोलन छेडणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 34 पेट्रोलपंप या आंदोलनात सहभागी होणार असून 12 रोजी मध्यरात्रीपासून 13 पर्यंत मध्यरात्रीपर्यंत हे पेट्रोलपंप बंद राहणार आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनी पंप चालकांवर लादलेल्या जाचक अटीविरोधात देशातील पंप चालकांनी हा संप पुकारला आहे, असे सांगण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील पेट्रोल पंप चालकांची बैठक कणकवली येथील नीलम कन्ट्रीसाईड हॉटेलमध्ये झाली. जिल्हय़ातील सर्व पेट्रोलपंप चालक यावेळी उपस्थित होते.

4 नोव्हेंबर 2016 चा करार अंमलात आणा, पुरेसे डिलर मार्जिन द्या, बेकायदेशीर एमडीजीच्या दुरुस्त्या रद्द करा व एक देश-एक इंधनाचा दर अंमलात आणा, या पेट्रोलपंप धारकांच्या प्रमुख चार मागण्या आहेत. या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हय़ातील पेट्रोलपंप चालकांची एकत्रित संघटना असून या संपात सहभागी होण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष रमेश भाट यांनी संप यशस्वी करण्यात येईल, असे सांगितले.

सचिव रोहन देसाई, प्रवीण पोकळे, अविनाश देसाई, संजय देसाई, ओंकार देसाई, संतोष कदम, रवी मालवणकर, किरण पोकळे व अन्य पेट्रोल पंप मालक यावेळी उपस्थित होते.

Related posts: