|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » उद्योग » 1,399 रुपयांत 4जी स्मार्टफोन

1,399 रुपयांत 4जी स्मार्टफोन 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कार्बन मोबाईल्स या कंपनीबरोबर अल्प किमतीतील 4जी स्मार्टफोन सादर करण्यासाठी भागीदारी करण्यात आल्याची घोषणा भारती एअरटेल या कंपनीने बुधवारी केली. कंपनीकडून 1,399 रुपयांत टचस्क्रीन, डय़ुअल सिम असणारा मोबाईल सादर करण्यात येईल. या फोनमध्ये युटय़ुब, व्हॉट्सऍप, फेसबुक या ऍपचा वापर करता येईल.

भारती एअरटेलकडून कार्बन ए40 इंडियन या नावाने स्मार्टफोन दाखल करण्यात येईल. यानंतर प्रतिमहिना 169 रुपयांची मासिक रिचार्ज करावे लागणार. मर्यादित प्रमाणात डेटा आणि कॉलिंग असणाऱया या फोनमध्ये संच उपलब्ध असेपर्यंत विक्री करण्यात येईल. हा 4जी फोन 2,899 रुपयांचे डाऊन पेमेन्ट केल्यावर ग्राहकांना मिळेल. पुढील 36 महिन्यांपर्यंत 169 रुपयांचे मासिक रिचार्ज करावे लागेल. 18 महिन्यानंतर 500 रुपये आणि 36 महिन्यानंतर उर्वरित 1 हजार रुपये ग्राहकाला परत मिळतील. सध्या या फोनची बाजारात 3,499 रुपये किंमत आहे.

 

 

सुविधा…

4 इंच टचस्क्रिन असणाऱया फोनमध्ये ऍन्ड्रॉईड 7.0 नोगट ऑपरेटिंग प्रणाली आहे. मायएअरटेल, एअरटेल टीव्ही, विंक म्युझिक ही ऍप प्रीलोडेड असतील. 1.3 गिगाहर्ट्जचा प्रोसेसर असून 1400 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. 1 जीबी रॅम असून 8 जीबी स्टोरेज आहे. 32 जीबीपर्यंत वाढविता येते. रिअर कॅमेरा 2 मेगापिक्सल आणि सेल्फी कॅमेरा 0.3 मेगापिक्सल असेल.