|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रेहान नदाफला मदर इंडिया फौंडेशनचा पुरस्कार प्रदान

रेहान नदाफला मदर इंडिया फौंडेशनचा पुरस्कार प्रदान 

कोल्हापूर

मदर इंडिया फौंडेशनच्यावतीने देण्यात येणारा प्राईड ऑफ मदर इंडिया हा पुरस्कार रेहान नदाफ उजळाईवाडी (ता.करवीर) याला नुकताच प्रदान करण्यात आला. कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे संस्थेच्या 11 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार रेहाना नदाफ याला देण्यात आला.

चिमुकल्या रेहान याने मे महिन्याच्या शाळेच्या सुट्टीमध्ये ‘लेक वाचवा, देश वाचवा’ अंतर्गत अनेक गावात जाऊन जनजागृती केली. या कार्याची दखल घेऊन रेहानला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. चित्रपट कलाकार सिद्धी कामत, संस्थेचे संस्थापक संजय डुबल, किरण गायकवाड, ज्ञानदेव बागडे, दिलीप प्रभाळकर उपस्थित होते. कार्यक्रमास दोडमणी, बी. एस. खोत, सतीश उपळावीकर उपस्थित होते. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.