|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मोटारसायकल अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

मोटारसायकल अपघातात दोघांचा जागीच मृत्यू 

वार्ताहर/ कुर्डुवाडी

मद्यधुंद अवस्थेतील चालकाने टेंभुर्णीकडे जाणाऱया मोटारसायकलीला मागून जोराची धडक देत ट्रक अंगावरुन नेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. सुहास भारत चव्हाण रा. लव्हे व नवनाथ धोंडिबा गोरे रा. सापटणे (भोसे) ता. माढा मृतांची नावे आहेत. या अपघातात कुर्डुवाडी टेंभुर्णी रस्त्यावरील कुर्डू गावातील दत्तमंदिराजवळ बुधवारी 11 रोजी दुपारी 1 च्या सुमारास घडला. याबाबत गौतम राऊत यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.   

याबाबतची माहिती अशी की, सुहास भारत चव्हाण (वय 32) रा. लव्हे व नवनाथ धोंडीबा गोरे (वय 45) रा. सापटणे भोसे, ता. माढा. हे दोघे एका मोटारसायकल क्रमांक (एम एच 45 एक्स 0736) वरुन व फिर्यादी गौतम राऊत (वय 28)रा. सापटणे भोसे. हे त्यांच्या मागून मोटारसायकलवरुन जात असताना कुर्डू शिवारातील दत्त मंदिरासमोर त्याच दिशेने जाणारा (ट्रक नं. एम. एच. 42 टी. 9630) ने त्या दोघांना जोरात धडक देऊन त्यांच्या अंगावरून ट्रक नेल्याने ते दोघे जागीच ठार झाले.

अपघातानंतरही ट्रक चालक तसाच पळून जात असताना फिर्यादीने पुढे जाऊन त्याला अडवले त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. यातील ट्रकचालक मधुकर बबन सुतार (वय 45 रा. कळस ता. इंदापूर) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. ट्रकचालकास पोलिसांनी अटक केली असून तपास पो.उ.नि बेदरे हे करीत आहेत.

Related posts: