|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » Top News » भरधाव गाडीने दोन मुलींना चिरडले ; दोघींचा जागीच मृत्यू

भरधाव गाडीने दोन मुलींना चिरडले ; दोघींचा जागीच मृत्यू 

ऑनलाईन टीम / पुणे :

बारामतीत मोरगाव रोडवर कऱहावाघज येथे दोन शाळकरी मुलींना भरधाव गाडीने चिरडल्याची माहिती मिळाली आहे. गुरूवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली आहे.

अंजणगावच्या सोमेश्वर शाळेत या मुली परीक्षेला जात असताना ही घटना घडली आहे. या अपघातात दोन शाळकरी मुलींचा जागीच मृत्यू झाला असून एकीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. आठवीत शिकणाऱया दिव्या पवार आणि सातवीत शिकणाऱया समिक्षा विटकर या विद्यार्थीनींचा जागीच मृत्यू झाला. बारामतीचे शिवसेना शहर प्रमुख पप्पू माने यांची ही गाडी असल्याची चर्चा आहे. पप्पू माने स्वतः गाडी चालवत असताना हा अपघात झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने पप्पू माने यांची गाडी पेटवून दिल्याची माहिती मिळाली आहे.

 

Related posts: