|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात पोटनिवडणुकीत आरपीआयच्या हिमाली कांबळे विजयी

पुण्यात पोटनिवडणुकीत आरपीआयच्या हिमाली कांबळे विजयी 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यातील प्रभाग क्र.21मधील पोटनिवडणूकीत आरपीआयच्या हिमाली कांबळे विजयी झाल्या आहेत. उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी हिमालीने ही पोटनिवडणूक लढवली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांचा पराभाव केला.

प्रभाग क्र.21 कोरेगाव पार्क-घोरपडीच्या एका जागेसाठी काल मतदान झाले होते. या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढलेल्या हिमाली कांबळे यांना एकूण 7 हजार 899मते तर राष्ट्रवादीच्या धनंजय गायकवाड 3 हजार 416मते मिळाली. यामध्ये हिमाली यांचा 4 हजार 483 मतांनी विजय झाला आहे.