|Sunday, July 22, 2018
You are here: Home » Top News » पुरावे असल्यास चौकशी व्हायला हवी ; जय शहाप्रकरणी आरएसएसची भूमिका

पुरावे असल्यास चौकशी व्हायला हवी ; जय शहाप्रकरणी आरएसएसची भूमिका 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोणावरही आरोप करण्यासाठी त्याचे पुरावे दिले पाहिजेत. कोणत्याही व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप असतील, तर त्याची चौकशी व्हायला. पण अशी चौकशी करण्यापूर्वी संबंधित आरोप कशाच्या आधारावर केले जात आहेत, त्याचे पुरावे दिले गेले पाहिजेत, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांनी मांडली.

गुरुवारी भोपाळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर होसाबळे यांनी ही भूमिका मांडली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा संचालक असलेल्या कंपनीच्या आर्थिक उलाढालीत तब्बल 16 हजार पटीने वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. असे असताना शहा पिता-पुत्रांच्या बचावासाठी आरएसएस पुढे आली आहे. जर कोणावरही आरोप करायचे असल्यास त्याचे पुरावे द्यावे. जर या आरोपांचे पुरावे असल्यास त्याची चौकशी व्हायला हवी, अशी भूमिका आरएसएसने मांडली.

Related posts: