|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » leadingnews » अरूषी हत्याकांड ; तलवार दाम्पत्यांची निर्दोष मुक्तता

अरूषी हत्याकांड ; तलवार दाम्पत्यांची निर्दोष मुक्तता 

ऑनलाईन टीम / अलाहबाद :

देशातील सर्वात गाजलेल अरूषी – हेमराज हत्याकांड प्रकरणात तलवार दाम्पत्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अलाहबाद हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे.

16 मे 2008 रोची अरूषीची घरात हत्या करण्यात आली होती.त्यानंतर दुसऱय दिवशी छतावरून तलवार  कुटुंबीयातील नोकर हेमराज याचाही मृतदेह सापडला होता. याप्रकरणी अरूषीचे आई- वडील राजेश आणि नुपुर तलवार यांना सीबीआयने 26 नोव्हेंबर 2013 रोजी अटक पेले होते. त्यांनतर त्यांना जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली. या निणर्याविरोधात राजेश आणि नुपूर तलवार यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आज सुनावणी करण्यात आली यात तलवार दाम्पत्याची अखेरी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.ठोस पुरावे न मिळाल्याने ही सुटका करण्यात आल्याची माहिती अलाहबाद हायकोर्टाने दिली आहे.

 

Related posts: