|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Automobiles » बजाजची नवी Platina ComforTec लाँच

बजाजची नवी Platina ComforTec लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी Platina ComforTec ही बाइक लाँच केली आहे. रेग्युलर मॉडेलपेक्षा या बाइकमध्ये अत्याधुनिक असे फिचर्स देण्यात आले आहेत.

– असे असतील या बाइकचे फिचर्स –

– इंजिन – या नव्या मॉडेलमध्ये 102 सीसीचे DTS-i इंजिन देण्यात आले असून, 7500 आरपीएमवर 8.2 पीएसचा पॉवर आणि 5000 आरपीएमवर 8.6 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे.

– मायलेज – 104 किमी / प्रतिलिटर

– अन्य फिचर्स – प्लॅटिनाच्या नव्या मॉडेलमध्ये ऍनालॉग स्पीडोमीटर, फ्ल्यूल गॉज देण्यात आले आहेत. तसेच या नव्या मॉडेलमध्ये रि-डिझायन्ड इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. प्लॅटिनाचा हा नवा वेरियंट यापेक्षा अधिक स्टायलिश असा असणार आहे.

– किंमत – 46 हजार 656 रुपये.