|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » Top News » हिमाचल प्रदेशात 9 नोव्हेंबरला मतदान ; आचारसंहिता लागू

हिमाचल प्रदेशात 9 नोव्हेंबरला मतदान ; आचारसंहिता लागू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. राज्यात 9 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी गुरुवारी सांगितले.

दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ज्योती यांनी ही माहिती दिली. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 9 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यासाठी 16 ते 23 ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकतो. तसेच या निवडणुकांची मतमोजणी 18 डिसेंबरला होणार आहे. या मतदानासाठे छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र मतदाराकडे असणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय उमेदवाराच्या निवडणुकांच्या खर्चावर मर्यादाही देण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराला 28 लाख रुपयांपर्यंत प्रचारासाठी खर्च करण्याची मर्यादा लावून देण्यात आली आहे. या निवडणुकीत यंदा प्रथमच मतदानासाठी सर्व मतदान पेंद्रामध्ये व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राचा वापर होणार आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे ज्योती यांनी स्पष्ट केले.

Related posts: