|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » विविधा » जेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांची कार जाते चोरीला …

जेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांची कार जाते चोरीला … 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आत्तापर्यंत आपण कार चोरीच्या अनेक घटना ऐकल्या-पाहिल्या असतीलच. यापैकी बहुतांश कार सामान्य व्यक्ती, उद्योजक किंवा समाजातील अन्य प्रतिष्ठित व्यक्तींच्या असल्याचे निर्देशनास येते. मात्र, जेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांची कार चोरीला जाते तेव्हा… दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कार चोरीला गेल्याची घटना गुरुवारी घडली.

आपले साधे राहणीमान, पदाचा कोणत्याही प्रकारचा बडेजावपणा नसणाऱया केजरीवाल यांची निळी वॅगन-आर कार आज चोरीला गेली आहे. केजरीवाल यांनी ही कार सचिवालयासमोर पार्क केली होती. त्यावेळी चोरटय़ांनी त्यांची कार चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. केजरीवालांची ही वॅगन-आर कार एक प्रतिकात्मक होती. त्यांच्या आंदोलनादरम्यान ही कार त्यांच्यासोबत नेहमी असायची. तसेच त्यांचा कोणत्याही ठिकाणचा प्रवास असो, तेव्हा ही कार त्यांच्यासोबत असायचीच. मात्र, खुद्द मुख्यमंत्र्यांची कार चोरीला गेल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली आहेत.