|Thursday, January 17, 2019
You are here: Home » उद्योग » बिझनेस टीव्ही… येस बँकच्या एनडीए शाखेचे उद्घाटन

बिझनेस टीव्ही… येस बँकच्या एनडीए शाखेचे उद्घाटन 

पुणे / प्रतिनिधी :

येस बँक या भारताच्या खासगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकावरील सर्वांत मोठय़ा बँकेच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी शाखेचे येथे उद्घाटन करण्यात आले. राज्यभरातील विस्तारप्रक्रियेचाच हा भाग आहे.

याअंतर्गत भारतीय लष्कर, त्यांचे कुटुंबिय आणि एनडीएमध्ये कार्यरत असणारे सामान्य नागरिक यांना येस विजय या उपक्रमाद्वारे बँक सेवा पुरवण्यात येणार आहेत. या शाखेचे उद्घाटन वायएसएम (ब्रिगेडिअर ऍडम, एनडीए) चे ब्रिगेडिअर झुबिन ए. मिनवल्ला यांच्या हस्ते करण्यात आले.

येस बँकच्या रिटेल आणि व्यावसायिक बँक सेवांच्या सीनिअर ग्रूपचे अध्यक्ष प्रलय मोंडाल म्हणाले, येस बँकेतर्फे आपल्या देशासाठी अदम्य ऊर्जा आणि योगदान देणाऱया आपल्या लष्करी दलाला मानवंदना देण्यात आली आहे. लष्करी अधिकाऱयांना विशेष वित्तीय मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन त्यांच्या अनोख्या जीवनशैलीशी जुळणारे असायला हवे. यासाठीच येस बँकेने प्रमुख माहितीवर आधारित अशी बँक सेवा आमच्या ग्राहकांना देण्याचे ठरवले आहे. लष्करी अधिकाऱयांसाठी येस विजय उपक्रमातून हे मांडण्यात येणार आहे. अधिकारी आणि त्यांचे कुटुंबिय आता सर्वोत्तम बँक सेवेचा अनुभव येस बँकेसह घेऊ शकतील. बँक त्यांची एक विश्वासार्ह भागीदारच बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

Related posts: