|Thursday, October 12, 2017
You are here: Home » उद्योग » पतंजली करणार चाऱयाची विक्री

पतंजली करणार चाऱयाची विक्री 

बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आता पशु चाऱयाच्या व्यवासायात पदार्पण करणार आहे. मध्यमवर्गींयानंतर आता शेतकऱयांवर लक्ष्य केंद्रित करत पतंजलीने ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे चारा व्यवसायातील पदार्पणातच पतंजलीला एक मोठी ऑर्डरदेखील मिळाली आहे. पशुखाद्याशी संबंधित पतंजली फोराजचे प्रमुख यशपाल आर्य यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत देशातील सर्वात मोठी दुग्ध कंपनी अमूलकडून ही ऑर्डर मिळाल्याचे स्पष्ट केले.

पतंजलीकडून अमेरिकेहून आयात करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाद्वारे मक्याचा हिरवा चारा तयार करण्यात येणार आहे. या चाऱयामुळे गायीच्या दुधात वाढ होणार असल्याचेही पतंजलीकडून सांगण्यात आले आहे. यासाठी पतंजली थेट शेतकऱयांशी संपर्क साधत मका उत्पादनासाठी प्रेरित करणार आहे. हा मका नंतर चारा तसेच अन्य उपयोगासाठी पतंजलीकडून खरेदी करण्यात येईल. अमूलने पतंजलीच्या गुजरातमधील हिम्मतनगर प्रकल्पामधून 10 हजार मेट्रिक टन चारा खरेदी करण्यासाठी होकार दर्शविला आहे. यासाठी 6 कोटीं रुपयांची आगाऊ नोंदणीही अमूलने केली आहे. दुग्ध संकलक केंद्रांना हा चारा बाजारात मिळणाऱया सुक्या चाऱयाच्या दरातच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही पतंजलीकडून सांगण्यात आले आहे.

Related posts: