|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » उद्योग » दिपावली निमित्त जिओची खास योजना

दिपावली निमित्त जिओची खास योजना 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

दिपावलीच्या निमित्ताने मुकेश अंबानींच्या जिओ टेलिकॉमने आणखी एम धमाकेदार योजना सादर केली आहे. दिपावलीची भेट देताना कंपनी ‘जिओ दिवाली धना धन’ योजनेतील 399 रुपयांच्या प्लॅन अंतर्गत पूर्ण रोख परतावा (फुल्ल कॅश बॅक) देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रीपेड ग्राहकांना 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान 399 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार असून 19 ऑक्टोबरपासून ही योजना लागू होईल.

या रिचार्जनंतर ग्राहकांना त्यांच्या जिओ ऍपमध्ये 50 रुपयांचे 8 व्हाऊचर्स मिळतील. म्हणजेच 399 रुपयांवर 400 रुपयांचा कॅशबॅक, 309 रुपयांहून अधिकचा रिचार्ज करताना हे व्हाऊचर्स एक-एक करून वटवता येतील. तसेच डेटा रिचार्ज करताना या व्हाऊचर्संचा वापर करायचा झाल्यास 99 रुपयांहून अधिकचा डेटा ऍड-ऑन पर्याय निवडावा लागणार आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत हे व्हाऊचर्स वटवता येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

 

 

 

 

Related posts: