|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » इचलकरंजीत ‘अब और नहीं’कार्यक्रम उत्साहात

इचलकरंजीत ‘अब और नहीं’कार्यक्रम उत्साहात 

प्रतिनिधी /इचलकरंजी :

      आजच्या समाज व्यवस्थेमध्येही स्त्राr जन्मापासून हिंसा-अत्याचार सोसताना दिसते आहे. तसेच सर्वसामान्य गोरगरिब विस्थापितांची ससेहोलपट होताना दिसत आहे. या सर्व गोष्टींचा वेध घेणारा सामाजिक आशयाचा ‘अब और नहीं’ हा नृत्यविष्कार उत्साहात पार पडला.

    स्त्राr गर्भपात, लैंगिक शोषण, मुलींवर होणारा अन्याय त्याचबरोबर ऑनर किलींग, दहशतवाद, विकासाच्या नावावर होणारे विस्थापन, धार्मिक उन्माद अशा सर्व समस्यांचा वेध या नृत्याविष्कारातून प्रभावीपणे मांडण्यात आला. कोणत्याही शब्दाविना केवळ प्रभावी शास्त्राrय स्वर व आलाप आणि लोकसंगीत व मिश्रसंगीताच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सादर करण्यात आला. स्लाईडस्च्या सहाय्याने या नृत्य नाटिकेचे सादरीकण अधिकच परिणामकारक झाले. अहिंसेचे सातत्य शक्ती आणि धाडसामुळे हिंसक व दमनकारी व्यवस्थेचे परिवर्तन होऊ शकते असा सकारात्मक संदेश या कार्यक्रमाने शेवटी दिला. याच कार्यक्रमाचे प्रयोग मदुराई येथे होणाऱया राष्ट्रीय एकता परिषदेमध्ये सादर होणार आहे.

 

Related posts: