|Sunday, July 22, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इम्रान खान अडचणीत, आयोगाने दिले अटकेचे आदेश

इम्रान खान अडचणीत, आयोगाने दिले अटकेचे आदेश 

इस्लामाबाद / वृत्तसंस्था :

क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर राजकारणात उतरलेल्या इम्रान खान यांच्या अडचणी वाढू शकतात. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मानहानीच्या एका प्रकरणी गुरुवारी इम्रान यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट काढले. अनेकवेळा समन्स बजावून देखील इम्रान हजर न राहिल्याने आयोगाने हे पाऊल उचलले.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करून 26 ऑक्टोबर रोजी होणाऱया पुढील सुनावणीवेळी हजर केले जावे असा आदेश आयोगाने दिला. इम्रान यांच्याविरोधात मानहानीचे प्रकरण पक्षाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक अकबर बाबर यांनीच दाखल केले. या वॉरंटला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल असे पक्षाकडून सांगण्यात आले.

पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे पुत्र हसन आणि हुसेन यांना राष्ट्रीय उत्तरदायित्व आयोगासमोर हजर राहण्यासाठी 30 दिवसांची मुदत मिळाली. पनामा पेपर लीक प्रकरणी पंतप्रधानपद गमाविणारे शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची सुनावणी हा आयोग करत आहे. जर शरीफ यांचे पुत्र हजर राहिले नाही तर त्यांना गुन्हेगार घोषित केले जाईल असे आयोगाने म्हटले.

 

 

 

Related posts: