|Sunday, July 22, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केंद्रीय मंत्र्याकडून यशवंत सिन्हा लक्ष्य

केंद्रीय मंत्र्याकडून यशवंत सिन्हा लक्ष्य 

नवी दिल्ली /वृत्तसंस्था :

अर्थव्यवस्थेच्या मुद्यावर स्वपक्षीय सरकारला लक्ष्य केल्यानंतर माजी अर्थमंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा इतर वादग्रस्त मुद्यांवर केंद्राविरोधात मैदानात उतरले आहेत. या प्रकारामुळे सरकारच्या वतीने देखील अनेक मंत्री आणि दिग्गज नेते त्यांच्यावर हल्ला चढवित आहेत. यशवंत सिन्हांनी काश्मीरमध्ये फुटिरवाद्यांची भेट घेतल्याने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी त्यांना देशद्रोही संबोधिले.

जय शाह यांच्या मुद्यावर सिन्हांनी याप्रकरणी भाजपने आपली नैतिकता गमाविल्याचा आरोप केला. तसेच ज्याप्रकारे केंद्रीय मंत्री याबाबत स्पष्टीकरण देत आहेत, त्यावरून यात काळंबेरं असल्याचे स्पष्ट होते असेही सिन्हा म्हणाले होते.

बाबुल यांनी याच वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. यशवंत सिन्हांकडे भाजपला देण्यासारखे काहीच नाही, परंतु आमच्यासारख्या नव्या पिढीला प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते आम्हाला नुकसान का पोहोचवित आहेत असा सवाल बाबूल यांनी उपस्थित केला. सिन्हा यांनी फुटिरवाद्यांशी भेट घेणे चुकीचे होते. हा एक प्रकारचा देशद्रोहच असल्याचे बाबूल म्हणाले. यशवंत सिन्हा काँग्रेसमध्ये गेल्यास त्यांच्यासाठी तो एक चांगला वृद्धाश्रम ठरेल अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली.

 

Related posts: