|Sunday, July 22, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शाहांच्या पुत्राचा संघाकडून बचाव

शाहांच्या पुत्राचा संघाकडून बचाव 

भोपाळ / वृत्तसंस्था :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुलाच्या कंपनीवरून निर्माण झालेल्या वादावर शाह यांचा बचाव केला. आरोपांची चौकशी व्हावी, त्याचबरोबर आरोप करणारे किती गंभीर आहेत हे देखील पाहणे गरजेचे आहे. आरोप करणाऱयांनी ते सिद्ध करून दाखवावे असे संघाने म्हटले.

भोपाळमध्ये संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जय शाह याच्यावर झालेल्या आरोपांवर उत्तर देताना सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी शाह यांचा बचाव केला.

संघ कार्यकर्त्यांवर हल्ले

यावेळी होसबाळे यांनी केरळमध्ये संघ कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला. आम्ही देशभरात या हल्ल्यांच्या विरोधात चर्चा घडवून आणत आहोत. जे लोक हल्ले करत आहेत, ते पराभूत झाले आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीचे आम्ही अगोदरच स्वागत केले असून लोक या पुढाकारांना स्वीकारत आपल्या प्रतिक्रिया देत असल्याचे ते म्हणाले.

संक्रमणकाळातून जातोय देश

सध्या देश एका संक्रमणकाळातून जात आहे. अशा स्थितीत समाजाच्या लोकांमध्ये संवाद असणे गरजेचे आहे. समाजात जनमत निर्माण करणाऱया प्रतिनिधींमध्ये देशाची सुरक्षा, सामाजिक जीवन समवेत अनेक मुद्यांवर चर्चा व्हावी.  देशाची तरुणाई सातत्याने संघाशी जोडली जात असल्याने आम्ही आनंदी आहोत. 2015-2016 दरम्यान संघात प्रवेश करणाऱया तरुणाईच्या संख्येत 41 टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला.

या अगोदर गुरुवारी सकाळी अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाची बैठक सुरू झाली. यात एका प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यात सरसंघचालक मोहन भागवत, सहसरकार्यवाह भय्याजी जोशी, सहकार्यवाह सुरेश सोनी समवेत संघाच्या 300 पेक्षा अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला.

 

Related posts: