|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » क्रिडा » केदार, स्मृती, विदित, आकाश यांना पुरस्कार घोषित

केदार, स्मृती, विदित, आकाश यांना पुरस्कार घोषित 

वृत्तसंस्था / मुंबई :

मुंबईच्या क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे भारताच्या केदार जाधवला वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार 23 ऑक्टोबर रोजी दिला जाणार आहे. याचवेळी अन्य क्रीडापटूंनाही पुरस्कार देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय वरि÷ पुरुष हॉकी संघात स्थान मिळविलेला पुण्याचा आकाश चिकटे व नाशिकचा ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराथी या दोघांना संयुक्तपणे या वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कार दिला जाणार आहे. स्टार स्पोर्ट्सचा पाठिंबा असलेले हे पुरस्कार बॉम्बे जिमखाना येथे प्रदान करण्यात येणार आहेत.

25 वषीय गोलरक्षक आकाश चिकटे हा गेल्या वषी मलेशियातील आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे जेतेपद मिळविलेल्या भारतीय संघाचा सदस्य आहे तर 22 वर्षीय विदित गुजराथीने अलीकडेच लिनारेस येथे झालेल्या स्पॅनिश टीम चॅम्पियनशिप लीगमध्ये टीम सॉल्वेचे प्रतिनिधित्व करताना आपली गुणवत्ता दाखवून देत 2700 एलो गुणांकन गाठण्यात यश मिळविले. असा पराक्रम करणारा तो भारताचा चौथा बुद्धिबळपटू असून याआधी विश्वनाथन आनंद, पी. हरिकृष्ण व के. शशीकिरण यांनी हा मान मिळविला होता.

मुंबईची जलतरणपटू अदिती धुमटकरची वर्षातील सर्वोत्तम महिला क्रीडापटूची निवड करण्यात आली आहे. अदितीने गेल्या वषी रांचीत झालेल्या ग्लेनमार्क वरि÷ राष्ट्रीय जलतरण स्पर्धैत 50 व 100 मी. फ्रीस्टाईलचे सुवर्ण तर 200 मी. फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदक मिळविले होते. भारताचा 49 वा ग्रँडमास्टर बनलेला पुण्याचा बुद्धिबळपटू अभिमन्यू पुराणिक याची वर्षातील सर्वोत्तम कनि÷ क्रीडापटू पुरस्कारासाठी तर मुंबईची जलतरणपटू रायना साल्ढाणा व टेटेपटू दिया चितळे यांची वर्षातील सर्वोत्तम कनि÷ महिला क्रीडापटू पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कॅरमपटू प्रशांत मोरे याची भारतीय खेळातील वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्याने 2016 मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या विश्व कॅरम चॅम्पियनशिपमध्ये एकेरीचे जेतेपद पटकावले होते.

या पुरस्कारासाठी ऑगस्ट 16 ते जुलै 2017 या कालावधीतील कामगिरीचा विचार करण्यात आला. केदार जाधवला वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रीडापटू, मुंबईचा अष्टपैलू अभिषेक नायरची वर्षातील सर्वोत्तम रणजीपटू, मुंबईचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉची वर्षातील सर्वोत्तम कनि÷ क्रिकेटपटू पुरस्कारासाठी निवड झाली आहे. महिलांमध्ये सांगलीच्या स्मृती मानधनाला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय आयपीएलच्या दहाव्या मोसमाचे जेतेपद मिळविलेल्या मुंबई इंडियन्सला वर्षातील सर्वोत्तम संघ तर मुंबई सिटी एफसीला विशेष सांघिक प्रदर्शन केल्याबद्दल पुरस्कार दिला जाणार आहे. मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपरलीगमध्ये गेल्या मोसमात 23 गुण घेत अव्वल स्थान मिळविले होते.

Related posts: