|Thursday, October 12, 2017
You are here: Home » क्रिडा » भांब्री-शरण अंतिम फेरीत

भांब्री-शरण अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था /ताश्कंद :

150,000 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या ताश्कंद चँलेजर पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भांब्री आणि डी.शरण या बिगर मानांकित भारतीय जोडीने दुहेरीची अंतिम फेरी गाठली.

उपांत्य फेरीच्या सामन्यात भांब्री आणि शरण यांनी स्पेनच्या गुलिर्मो लोपेझ व पेरेझ यांचा 3-6, 7-5, 10-6 असा पराभव केला. एटीपी 250 स्पर्धेत शरणने अलिकडे सलग स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. ताश्कंद स्पर्धेतील दुहेरीतील विजेत्या जोडीला 125 एटीपी गुण व 9300 डॉलर्सची बक्षिसाची रक्कम विभागुन देण्यात येईल.

Related posts: