|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गाडीच्या धडकेत दोन मुलींचा मृत्यू

गाडीच्या धडकेत दोन मुलींचा मृत्यू 

वार्ताहर /बारामती :

शिवसेनेच्या बारामती शहरप्रमुखाच्या भरधाव वेगाने जाणाऱया गाडीने दोन शाळकरी मुलींना चिरडले. यामध्ये दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू झाला. बारामती-मोरगाव रस्त्यावर कऱहा वागजनजीक ही घटना घडली. पजेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने दोन्ही शाळकरी मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला.  

  समीक्षा मनोज विटकर (वय, 12) व विद्या ज्ञानेश्वर पवार ( वय, 13) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. दोन्ही मुली कऱहा वागजनजीक लष्कर वस्ती (ता. बारामती) येथील रहिवासी होत्या. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. गुरुवार सकाळी अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात या मुली निघाल्या होत्या. पुणे बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या पजेरो गाडीने समोरून धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.  गाडीचा मालक पप्पू माने हाच गाडी चालवत होता, असे सूत्रांनी सांगितले.

 अपघातानंतर शिवसेनेचा बारामती शहरप्रमुख असलेला पप्पू माने फरारी झाला आहे. यावेळी अपघातानंतर येथील संतप्त ग्रामस्थांनी गाडी पेटवून दिली. गाडी परत नेण्यासाठी आलेल्या एका इसमालाही संतप्त जमावाने चोप दिला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related posts: