|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » एकाच रात्रीत सात घरे फोडली

एकाच रात्रीत सात घरे फोडली 

निपाणी :

 निपाणी शहर व उपनगरात विविध ठिकाणी बंद घरे लक्ष केली. त्या पाठोपाठ कोडणी, दोनवेळा सौंदलगा, शिरगुप्पी ही गावे झाली. यानंतर पुन्हा निपाणी रामनगरात बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न झाला. अशा घटना दिवसामागून दिवस जातील तशा अधिकच घडत आहेत. पोलिसांना या बंद घरे फोडणाऱया चोरटय़ांना जेरबंद करण्यात अजूनही यश आलेले नाही. यातून चिंता व असुरक्षितता व्यक्त होत असतानाच जत्राट येथेही चोरटय़ांनी दवाखान्यासह चार घरे लक्ष करत फोडल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. तसेच भिमापूरवाडी आणि गळतगा येथेही चोरीच्या घटना घडल्या. या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

 सर्वत्र दीपावली सणाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. दीपावली सणाच्या तयारीत काय नियोजन असावे. आर्थिक तरतूद, परतीच्या पावसाची चिंता, धोक्यात आलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यातून कोणालाही उसंत मिळेनाशी झाली आहे. अशी दमछाक होऊन सर्व गाव झोपी गेल्याचा फायदा चोरटय़ांनी उठविल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. घर कुलूपबंद असल्याचे हेरून चोरटय़ांनी दवाखान्यासह चार घरे फोडली.

 सरलाबाई निंगाप्पा जबडे यांच्या महादेव गल्लीतील कुलूप तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. सर्व साहित्य विस्कटून किंमती वस्तूंचा शोध घेतला. यानंतर तिजोरीचा दरवाजा उचकटून त्यातील 5 हजारांची रोख रक्कम, त्याचबरोबर टॉप्स, लहान मुलाच्या 20 अंगठय़ा, रिंगा असे 2 तोळ्य़ांचे सोन्याचे दागिने, 150 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने घेऊन पोबारा केल्याचे उघडकीस आले.

Related posts: