|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्मार्ट सिटीच्या कामाला महिन्याच्या अखेरीस प्रारंभ

स्मार्ट सिटीच्या कामाला महिन्याच्या अखेरीस प्रारंभ 

प्रतिनिधी /बेळगाव :

केवळ दोन ते तीन कारणांमुळे स्मार्ट सिटी योजेनचे काम रेंगाळले होते. पण आता निविदा मागविण्यात आल्या असून या महिन्याच्या अखेरला प्रत्यक्ष कामाला  सुरूवात होईल, असे जिल्हय़ाचे प्रभारी सचिव राकेश सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अधिकाऱयांची प्रगती आढावा बैठक प्रादेशिक आयुक्त कार्यालयात त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

जिल्हय़ातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी अधिकाऱयांची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रभारी प्रादेशिक आयुक्त शिवयोगी कळसद, जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन हे उपस्थित होते. येत्या अधिवेशानापूर्वी समस्या समजून त्या मुख्यामंत्र्यांच्या समोर मांडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे राकेश सिंग म्हणाले.

अंगणवाडीला पुरविण्यात येणारा आहार वेळेत व पौष्टीक द्यावा, अंगणवाडीच्या इमारतींची समस्या दूर करावी, काही अंगणवाडय़ांच्या इमारती स्वत:च्या असल्यातरी बहुसंख्य अंगणवाडय़ा भाडोत्री इमारतीत चालविल्या जात आहेत. पण या अंगणवाडय़ांसाठी जागा उपलब्ध करून त्यांना इमारती बांधून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी अधिकाऱयांना केली. कृषी क्षेत्राच्या परिस्थितीबाबत   कृषी अधिकाऱयांकडून माहिती घेण्यात आली.

बी-बियाणे, खते उपलब्ध

मागील दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत यावषी पिके बरी आहेत. सध्या रब्बी पिकांचा पेरणीला प्रारंभ होणार आहे तर काही ठिकाणी पेरणीला सुरूवात झाली. आहे. त्यासाठी बी-बियाणे, खते उपलब्ध करण्यात आल्याची माहिती कृषी खात्याचे अधिकारी वेंकटरामन रेड्डी पाटील यांनी सांगितले. पशु-भाग्य योजनेसाठी जिल्हय़ातून अर्ज मागविण्यात आले होते. त्या अर्जदारांची छाननी करून त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. अशी माहिती पशु वैद्यकीय खात्याचे अधिकारी चंद्रशेखर यांनी दिली.

मागील वषी झालेल्या अधिवेशानात गॅस सिलेंडर पुरवठय़ाचा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा गॅस सिलेंडर पुरवठा वेळेत करावा, अशी सूचना राकेश सिंग यांनी केली आहे. बिम्स व सिव्हील हॉस्पिटलमधील समस्या सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी बिम्सचे मुख्यकार्यकारी संचालक एस. टी. कळसद यांनी समस्यांची माहिती दिली. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी अप्पासाहेब नरट्टी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Related posts: