|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भारतीय वैद्यकीय संघटनेतर्फे 14 रोजी डॉक्टरांसाठी ‘जिमकॉन’ परिषद

भारतीय वैद्यकीय संघटनेतर्फे 14 रोजी डॉक्टरांसाठी ‘जिमकॉन’ परिषद 

प्रतिनिधी /डिचोली :

भारतीय वैद्यकीय संघटना गोवा शाखा व गोव्यातील डिचोली शाखेच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरांसाठी नवनवीन शोध, तंत्रज्ञान व वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक पद्धती यावर दोन दिवसीय ‘29 व्या जमकॉन’ या परिषदेचे आयोजन येत्या शनि दि. 14 व रवि. 15 या दोन दिवसांत ताळगाव येथील समाज सभागृहात करण्यात आलेले आहे. अशी माहिती आयएमएच्या गोवा राज्य अध्यक्ष डॉ. मेधा साळकर, डिचोली शाखेचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर गोवा शाखेच्या खजिनदार डॉ कर्तवी माशेलकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

या परिषदेचे उद्घाटन शनि दि. 14 रोजी संध्या. 5.30 वा. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते होणार असून खास अतिथी म्हणून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे उपस्थित राहणार आहे. या परिषदेत सुमारे 400 डॉक्टर्स सहभागी होणार असून यावेळी प्रथमच ‘इŸन्ड ऑन ट्रेनिंग’ या तत्त्वावर स्वतः प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन व माहिती मिळविण्याची संधी डॉक्टरांना मिळणार आहे. विविध आजार व त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री 7 वा. डॉ. दीपक दुबे हे मार्गदर्शन करणार आहे. रोबोटीक पद्धतीने अवयव ट्रान्सप्लांट करणाऱया तंत्रावर ते सखोल माहिती देणार आहे. रात्री 8.15 वा. डॉ. दिनेश देशमाने हेही रोबोटीक तंत्रज्ञानातून शस्त्रक्रियेविषयी माहिती देणार. तत्पूर्वी सकाळी 9 वा. विविध वैद्यकीय औषधे चाचण्या व तपासणी यावर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

रवि.15 रोजी सकाळी 9 वा. पेपर सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर डॉ. कुमार प्रभाश हे फुफ्फुसाच्या कँन्सवर मार्गदर्शन करणार. डॉ. राज पलानीअप्पन हे बॅरियाट्रीक सर्जरीवर मार्गदर्शन करणार. डॉ. विकास अगरवाल हे झोपेच्या व्यवस्थापनावर मार्गदर्शन आहे. तर डॉ. सदानंद शेट्टी हे कोलेस्ट्रॉल दि.गुड, दि बॅड, दि. अगली! या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. या परिषदेत वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन औषधे, उपचार पद्धती, नवीन तंत्रज्ञान यावर प्रत्यशिकासह मार्गदर्शन केले जाणार आहे असे यावेळी सांगण्यात आले.

Related posts: