|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खनिज वाहतुकीसाठी 14 रुपयांवर ट्रकमालक ठाम

खनिज वाहतुकीसाठी 14 रुपयांवर ट्रकमालक ठाम 

प्रतिनिधी /धारबांदोडा :

सरकारच्या मध्यस्थिने खाण कंपन्यांनी देऊ केलेला खनिज वाहतूक दर आम्हाला मान्य नसून प्रति टन प्रति किलोमिटर किमान रु. 14 याप्रमाणे दर मिळाल्याशिवाय वाहतूक सुरु होणार नाही या भूमिकेवर धारबांदोडा तालुका ट्रकमालक संघटना ठाम राहिली आहे. स्थानिक आमदार दीपक पाऊसकर यांच्या उपस्थितीत काल गुरुवारी कोडली-तिस्क येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत नवीन दराचा प्रस्तव फेटाळून लावण्यात आला. येत्या आठवडय़ाभरात मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

  नव्याने खनिज वाहतूक हंगाम सुरु करण्यापूर्वी ट्रकमालकांच्या मागण्यांची पूर्तता करावी असा पवित्रा धारबांदोडा ट्रकमालक संघटनेने घेतला आहे. त्यामध्ये किमान रु. 14 याप्रमाणे वाहतूक दर ही मुख्य मागणी आहे. सरकारने त्यात मध्यस्थी करावी या मागणिला अनुसरुन बुधवार 11 रोजी ट्रकमालकांचे शिष्टमंडळ व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची पणजी येथे बैठक झाली होती. यावेळी स्थानिक आमदार दीपक पाऊसकर हेही उपस्थित होते. या चर्चेनंतर खाण कंपन्या प्रतिटन प्रतिकिलोमिटर रु. 12.50 पैसे याप्रमाणे दर देण्यास राजी झाल्या. मात्र हे दर देताना दहा किलोमटर पर्यंत रु. 12.50 पैसे, दहा किलो मिटरच्या पुढे रु. 12 तर वीस किलो मिटरपुढे रु. 11.30 पैसे याप्रमाणे दर देण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आमदार पाऊसकर यांनी कोलडी तिस्क येथील बैठकीसमोर मांडली. बाजारभावाप्रमाणे डिझेलदर मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच खाण अवलंबित सोडून इतर ट्रकमालकांना कुटुंबसदस्यानुसार नवरा, बायको व मुलांच्या नावे प्रत्येकी एक ट्रक वाहतुकीत गुंतविण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. जे ट्रकमालक खनिज वाहतूक सोडून इतर व्यावसायात ट्रक गुंतवतील त्यांना आधार म्हणून सरकारकडून दरमहा रु. 8 हजार मिळतील असा सरकारचा प्रस्ताव असल्याचे आमदार पाऊसकर यांनी बैठकीसमोर स्पष्ट केले. मात्र ट्रकमालकांनी दराबाबतचा हा प्रस्ताव फेटाळून लावित रु. 14 प्रमाणे वाहतूक दरावर ठाम असल्याचे सांगितले. जीपीएसबाबत सरकारने ट्रकमालांना दिलासा दिला असून यापुढे जीपीएस म्हणून रु. 500 आकारले जातील व सरकारकडे जमा झालेली अतिरिक्त रक्कम ट्रकमालकांना परत केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 

Related posts: