|Sunday, January 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » स्पेस डिल प्रा. लि. कंपनीस पुरस्कार

स्पेस डिल प्रा. लि. कंपनीस पुरस्कार 

प्रतिनिधी /पणजी :

गोव्यात आघाडीवर असलेल्या स्पेस डील प्रा. लि. कंपनीस ‘इंडिया ग्रेटेस्ट ब्रँड 2016-17’ हा पुरस्कार प्राप्त झाला असून कंपनीचे संचालक नरूल्हा वेलजी यांनी गोव्य़ाची मान रियल इस्टेट क्षेत्रात देशभरात उंचावली आहे. मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार वेलजी यांना देण्यात आला. त्यावेळी फिल्मस्टार धर्मेंद्र उपस्थित होते.

यूआरएस मीडिया कन्सलटींग प्रा. लि. या आंतरराष्ट्रीय मीडिया हाऊसतर्फे व रिसर्च कंपनीतर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळविणारे वेलजी हे एकमेव गोमंतकीय उद्योजक आहेत. ते गेली 35 वर्षे या व्यवसायात आहेत.

 

Related posts: