|Sunday, August 25, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » या संशोधनांनी जगाला कायमस्वरूपी बदलून टाकले

या संशोधनांनी जगाला कायमस्वरूपी बदलून टाकले 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जगातील प्रत्येक गोष्टीचा शोध कधी ना कधी कुठेतरी लागला आहे. अनेक वस्तूंचा शोध कुठे कसा लागला याविषयी अनेकांना माहित नाही. आज आम्ही तुम्हाला अशा संशोधनांविषयी सांगणार आहोत.

तांत्रिक घडय़ाळ :

आपण दैनंदिन जीवनात तांत्रिक घडय़ाळाचा वापर करत आहोत. या घडय़ाळाचे संशोधन चीन मध्ये गणितशास्त्र यी जिंग आणि लष्करी अभियंता लिआंग लिंगझन यांनी 725साली केला होता.

प्रिटींग प्रेस :

जोहान्स गटेनबर्ग यांनी 1440मध्ये प्रिटींग प्रेसचा शोध लावला होता. या शोधामुळे ‘वाडःमय’ला एकदम ‘साहित्या’चा दर्जा प्राप्त करून दिला.

थर्मोमीटर :

गॅलिलीयो गॅलीली यांनी 1592मध्ये थर्मोस्कोपचा शोध लावला. त्यानंतर 1612मध्ये मोजमाप करणाऱया थर्मास्कोपचा शोध चिकित्सक सेंटोरिया सैंटीरियो यांनी केला आहे.

फ्रीज :

फ्रिजचा शोध स्कॉटीश डॉक्टर विलियम कलन यांनी 1750मध्ये केला. विलियम कलन यांनी कृत्रिम फ्रिजचा शोध लावला होता. 1913पर्यंत घरगुती फ्रिजचा मॉडेल तयार करण्यात आला नव्हता.

 

फोटोग्राफी :

1816मध्ये प्रेंच संशोधक निकेफोरे निओपेस यांनी प्रथम एका कॅमेराससह कॅप्चर केलेल्या चित्राचा निराकरण केला होता.

दुरध्वनी :

दुरध्वनी या यंत्रणेच्या सर्वात प्राथमिक स्वरूपाचा शोध अलेक्झंडर ग्रॅहॅम बेल यांनी 1876मध्ये लावला. त्यानंतर 1882मध्ये भारतातही टेलिफोनचे झाले.