|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » संगमेश्वर जवळील दुचाकी व टेम्पो अपघातात 1 जण गंभीर

संगमेश्वर जवळील दुचाकी व टेम्पो अपघातात 1 जण गंभीर 

बसला ओव्हरटेक करताना दुचाकीस्वाराला अपघात

वार्ताहर /संगमेश्वर

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वरजवळ झालेल्या आयशर टेम्पो व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर दुचाकीस्वाराला उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

विक्रांत काशिनाथ बंडबे हे आपल्या ताब्यातील आयशर टेम्पा घेवून गोवा ते मुंबईला निघाले होते. ते संगमेश्वर जवळच्या मुळये बसथांब्याजवळ आले असता संगमेश्वरच्या दिशेने जाणारा दुचाकीस्वार अशोक लक्ष्मण राठोड यांने बसला ओव्हरटेक करीत असताना समोरील येणाऱया आयशर टेम्पोला धडक दिली.या अपघातात दुचाकीस्वार अशोक लक्ष्मण राठोड याला गंभीर इजा झाली आहे. हा अपघात गुरुवारी संध्याकाळी 4.30वा दरम्याने घडला. या अपघातानंतर अशोक राठोड याला रुग्णवाहिकेचे चालक प्रसाद सप्रे यांनी संगमेश्वर ग्रामिण रुग्णालयात दाखल केले.या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.