|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हनीप्रीतची न्यायालयीन कोठडीत रवानगी

हनीप्रीतची न्यायालयीन कोठडीत रवानगी 

चंढीगढ

 डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची मानसकन्या हनीप्रीत इन्सान हिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. शुक्रवारी तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात सादर करण्यात आली होती. यावेळी न्यायालयाने 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा निर्णय घेतला. हनीप्रीत हिचा मोबाईल पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला, मात्र लॅपटॉप अद्याप मिळालेला नाही. हनीप्रीत हिच्याव्यतिरिक्त सुखदीप कौर यालाही न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. दंगली भडकाविण्यासंदर्भातील पुरावे लॅपटॉपमध्ये आढळतील असे पोलिसांना वाटते. मात्र यापूर्वी पोलिसांनी टाकलेल्या धाडीतून काही पुरावे जमा केले आहेत. पोलीस कोठडीत असूनसुद्धा चौकशीला मदत केली नाही असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली नाही. हनीप्रीतच्या मोबाईलमध्ये राम रहीम याच्या गैरकृत्यांसंदर्भात काही धागेदोरे सापडतील असे पोलिसांना वाटते.

Related posts: