|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नुकसानग्रस्त शेतकऱयांची आमदार हुक्केरींकडून विचारपूस

नुकसानग्रस्त शेतकऱयांची आमदार हुक्केरींकडून विचारपूस 

प्रतिनिधी/ चिकोडी

चिकोडी तालुक्यात गत 8-10 दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शिवारात पाणी साचून राहिले आहे. काही शेतकऱयांच्या शिवारातील पिकेच बुडली आहेत. त्यामुळे शेतकऱयांतून चिंता व्यक्त होत आहे. आमदार गणेश हुक्केरी यांनी शुक्रवारी अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या तालुक्यातील नागराळ, नणदी, सिद्धापूर, अंकली, मांजरी, कल्लोळ, एकसंबा, मलिकवाड गावातील शिवारांना भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रसत शेतकऱयांशी संवाद साधला. यावेळी या भागाचा आमदार या नात्याने आपण राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबरोबर चर्चा करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.

Related posts: