|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

15 ते 21 ऑक्टोबर 2017

मेष

तुला राशीत सूर्य प्रवेश व चंद्र गुरु युती होत आहे. तुमच्या क्षेत्रातील कार्याला आता चांगला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात होईल.राजकीय, सामाजिक कार्यासाठी योजनात्मक मांडणी करा. मंगळवार, बुधवार ताण, तणाव व गैरसमज होईल. धंद्यात खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलांनी फटाके उडताना काळजी घ्यावी. लक्ष्मी, कुबेर पूजनानंतर तुमचा उत्साह वाढेल. लोकांच्या भेटी होतील. संसारात थोडीशी नाराजी असली तरी दिवाळीच्या पांडव्यापासून जीवनसाथीला खूष ठेवता येईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


वृषभ

दीपावली साजरी करताना वृषभेच्या काही लोकांचा उत्साह थोडा कमी असू शकतो. परंतु निसर्ग, प्राणी व देवता यांचे मनोभावे पूजन दीपावलीच्या सणात सामावले आहे. ही पारंपरिक  संस्कृती आहे. त्यामुळे त्यानिमित्त माणूस सर्व वेदना  सणासाठी तरी विसरू शकतो. तुला राशीत सूर्य प्रवेश व बुध गुरु युती होत आहे. नोकरीत कष्ट घ्यावे लागतील. धंद्यात कामगार वर्गाशी नम्रतेने व प्रेमाने वागा. राजकीय, सामाजिक कार्यात जबाबदारी स्वीकारावी लागेल. दिवाळी पाडवा व भाऊबीज यादिवशी अडचणी येण्याची शक्मयता आहे. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. प्रयत्नानेच यश मिळेल. मुलांनी फटाक्मयाबरोबर दंगा करू नये.


मिथुन

मानसिक तणाव दूर करून तुम्ही दिवाळी साजरी करा. तुमच्या सर्वच कार्यात आता हळूहळू यश मिळण्यास सुरुवात होणार आहे. कोणताही वाद व पेचप्रसंग, कोर्टकेस, याच्यातून दिवाळीनंतर मुक्तता  होऊ शकेल. उत्साह व आत्मविश्वासाने बदल होऊ शकेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळण्याची आशा निर्माण होईल. तुमच्या कार्याचे कौतुक होईल. सामाजिक संख्येत प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी मोठय़ा यशासाठी चांगले प्रयत्न करावेत. स्पर्धा जिंकता येईल.


कर्क

तुला राशीत सूर्य प्रवेश व चंद्र, शुक्र युती होत आहे. दिवाळीचा सप्ताह तुमच्या आनंदाला व उत्साहाला राहिल…. नव्या विचारांना चालना मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात आरेरावी करू नका. लोकप्रियता मिळेल. धंद्यात टिकविण्याचा प्रयत्न करा. शेअर्समध्ये लाभ मिळेल.  नोकरीत नमते धोरण ठेवावे लागेल. संसारात मौल्यवान खरेदी करताना सावध रहा. दिवाळी पाडवा व भाऊबीज यादिवशी फटाके उडवताना गोंधळ करू नये. विद्यार्थ्यांनी नम्रता ठेवावी.


सिंह

दिवाळी नव्या प्रेरणेची व आनंदाची ठरेल. वाहन, घर, जमिन इ. खरेदीची संधी मिळेल. विचार कराल. शुभ कार्याची सुरुवात  दिवाळीच्या पाडव्याला करता येईल. तुला राशीत सूर्य प्रवेश व बुध, गुरु युती होत आहे. कला, क्रीडा क्षेत्रात पुरस्कार, आर्थिक लाभ मिळेल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. धंद्यात जम बसेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. राजकीय, सामाजिक कार्यात व्यापक स्वरुपाचे कार्य होईल. लोकप्रियता  वाढेल. प्रयत्न करा.


कन्या

रविवार, सोमवार, किरकोळ अडचणी येतील. मनाविरुद्ध घटना घडेल. परंतु धन त्रयोदशीपासून तुमच्या प्रगतीचा रथ वेगाने धावणार आहे. तुला राशीत सूर्य प्रवेश बुध, गुरु युती होत आहे. तुमचे चातुर्याचे बोलणेच फार कौतुकास्पद ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळण्याची संधी येईल. कला,क्रीडा क्षेत्रात नवीन प्रगतीचा मार्ग मिळेल. धंद्यात सुधारणा होईल. संसारात मुलांच्या प्रगतीची खबर मिळेल. दिवाळीच्या पाडव्यापासून शुभ कार्याचा आरंभ करता येईल. मुलांनी आळस करू नये. म्हणजे शिक्षणात मोठे यश  मिळेल.


तूळ

तुमच्या राशीत सूर्य प्रवेश व बुध, गुरु युती होत आहे. बुधवार, गुरुवार घरात आपसात मतभेद होतील. प्रकृतीची काळजी घ्या. दुखापत संभवते. मुलांनी फटाके फोडताना मस्ती करू नये. राजकीय-सामाजिक क्षेत्रात दिवाळीच्या पाडव्यापासून चांगल्या घटना घडण्यास सुरुवात होईल. धंद्यात खर्च वाढू शकतो. वाद वाढवू नका. नोकरीत काम वाढेल. प्रेमात तणाव होईल. जमिन, घर, वाहन घेण्याची घाई करू नका. मौल्यवान वस्तू सांभाळा.


वृश्चिक

वृश्चिकेच्या व्ययस्थानात सूर्य प्रवेश व चंद्र, शुक्र युती होत आहे. दिवाळीच्या सुरुवातीच्या काळात उत्साह राहील. दिवाळीच्या पाडव्यापासून मन उदास राहील. वाद होऊ शकतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात हुकूमशाहीने कार्य बिघडेल. प्रति÷ा सांभाळा. धंद्यात वाढ होईल. शेअर्सचा अंदाज घेताना घाई नको. नोकरीत वरि÷ांच्या विरोधात जाऊ नका. जमिन, घर, वाहन घेताना कागदपत्रांची योग्य तपासणी करा. फटाके फोडताना मुलांनी उतावळेपणा व धाडस करू नये.


धनु

तुला राशीत सूर्य प्रवेश व चंद्र, शुक्र युती होत आहे. सुख-दु:ख यांचे चक्र चालूच असते. दिवाळी नुसती मौजमजा नसून संस्कृतीचे दर्शन आहे. पंचमहाभूतांचे आभार मानण्याचे एक साधन आहे.  वसुबारस म्हणजे गाय-वासरु, धन-धान्य व  निसर्ग यांचे पूजन करणे म्हणजे दिवाळी होय. त्यामुळे सर्वांनीच आपल्या मर्यादेनुसार साजरी करावी. आनंद मिळेल. भेटीगाठी होतील. लोकांचे प्रेम मिळेल. धंदा वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. विवाहासाठी स्थळे मिळतील. राजकीय-सामाजिक कार्यात उत्साह वाढेल. प्रेरणा मिळेल.


मकर

तुला राशीत सूर्य प्रवेश व बुध-गुरु युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कार्यात अडचणी येतील. नरकचतुर्दशीपासून वेगाने चक्र फिरण्यास सुरुवात होईल. धंद्यात फायदा होईल. नवा विचार मिळेल. नोकरीत जम बसेल. राजकीय- सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. अधिक वेगळय़ा डावपेचांची तयारी करा. दिवाळी आनंदाची व कार्यारंभाची ठरेल. सातत्य मात्र ठेवा. धरसोडवृत्ती नको. बुद्धी वापरा.


कुंभ

तुला राशीत प्रवेश करणारा सूर्य तुमची प्रति÷ा वाढवण्यास मदत करणार आहे. संसारात, धंद्यात किरकोळ वाद होतील. खर्च वाढेल. नरकचतुर्दशी व लक्ष्मीकुबेर पूजन या दिवशी मन अस्थिर राहील. जवळच्या माणसांना दुखवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ मान देतील. सहकारी व  मित्र यांच्याकडून सहकार्य मिळणे थोडे कठीण होईल. प्रवासात सावधपणे वाहन चालवा. मोठी खरेदी करताना गोंधळ होऊ शकतो. दिवाळी पाडव्याला चांगली बातमी मिळेल.


मीन

दिवाळी आनंदाची व उत्साहाची असली तरी मनावर एखादे दडपण राहील. तडजोड करावी लागेल. अरेरावी नको. गोड बोलण्याला भुलू नका. दुसऱयाचे डावपेच तुम्हाला अडचणीत टाकतील. राजकीय- सामाजिक कार्याला नम्रता ठेवा. कोणताही निर्णय स्वत:च्या हिमतीवर घेऊ नका. आरोप येईल. मुलांनी फटाके फोडताना दंगामस्ती करू नये. दुखापत होऊ शकते. जास्त अपेक्षा  कोणत्याही काळात ठेऊ नका. मोहापायी स्वत:चे आयुष्य बिघडू शकते. ही दिवाळी जगाचे ज्ञान शिकवणारी ठरू शकते.

 

Related posts: