|Thursday, July 19, 2018
You are here: Home » क्रिडा » पहिल्या वनडेत पाकिस्तानची लंकेवर मात

पहिल्या वनडेत पाकिस्तानची लंकेवर मात 

पाकिस्तान 83 धावांनी विजयी, बाबर आझमची शतकी खेळी, अष्टपैलू शोएब मलिक सामनावीर

वृत्तसंस्था/ दुबई

बाबर आझम (103), शोएब मलिक (81) व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या वनडेत लंकेवर 83 धावांनी विजय मिळवला. पाकने विजयासाठी ठेवलेल्या 293 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेला निर्धारित 50 षटकांत 8 बाद 209 धावापर्यंतच मजल मारता आली. या विजयासह पाकने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 61 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी करत 81 धावा फटकावणाऱया शोएब मलिकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय लंकन कर्णधार उपुल थरंगाला चांगलाच महागात पडला. सलामीवीर अहमद शेहजाद (0) स्वस्तात बाद झाला. यानंतर, फखर झामन व बाबर आझम जोडीने दुसऱया गडय़ासाठी 64 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. पण, 43 धावांवर झामनला धनंजयाने बाद करत ही जोडी फोडली. मोहम्मद हाफीजही 32 धावा काढून बाद झाल्याने पाक संघ संकटात सापडला होता. पण, शोएब मलिकने बाबर आझमला चांगली साथ देताना चौथ्या गडय़ासाठी 139 धावांची भागीदारी साकारत संघाला अडीचशे पार नेले. आझमने शानदार शतकी खेळी साकारताना 131 चेंडूत 5 चौकारासह 103 धावा फटकावल्या. शोएब मलिकनेही लंकन गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेताना 61 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह 81 धावांची खेळी साकारली. ही जोडी बाद झाल्यानंतर इमाद वासीम (नाबाद 10) व हसन अली (नाबाद 11) यांनी संघाला 292 धावापर्यंत मजल मारुन दिली. लंकेतर्फे सुरंगा लकमलने 2 गडी बाद केले.

प्रत्युतरादाखल खेळणाऱया लंकेला विजयासाठीचे आव्हान पेलवले नाही व त्यांना निर्धारित 50 षटकांत 8 बाद 209 धावापर्यंत मजल मारता आली. सलामीवीर निरोशन डिक्वेला (19), उपुल थरंगा (18) व दिनेश चंडिमल (4) स्वस्तात तंबूत परतले. मधल्या फळीतील फलंदाजानीही निराशा केली. लहिरु थिरिमनेने सर्वाधिक 74 चेंडूत 53 धावा फटकावल्या. अकिला धनंजयाने नाबाद 50 धावांचे योगदान दिले. पाक गोलंदाजाच्या नियंत्रित माऱयासमोर लंकन फलंदाजाला अपेक्षित कामगिरी साकारता आली नाही. पाकतर्फे रुमान रईस व हसन अली यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान 50 षटकांत 6 बाद 292 (बाबर आझम 103, शोएब मलिक 81, फखर झामन 43, सुरंगा लकमल 2/47, गमागे 1/49). श्रीलंका 50 षटकांत 8 बाद 209 (लहिरु थिरिमने 53, धनंजया नाबाद 50, परेरा 21, रुमान रईस 3/49, हसन अली 3/36).

नावीर

Related posts: