|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कागलच्या श्री गहिनीनाथ गैबी पीर ऊरुसानिमित्त विविध कार्यक्रम

कागलच्या श्री गहिनीनाथ गैबी पीर ऊरुसानिमित्त विविध कार्यक्रम 

प्रतिनिधी / कागल

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील श्री गहिनीनाथ गेबी पीर यांचा उरुस शुक्रवार दि. 20 ते बुधवार दि. 25 ऑक्टोबर अखेर साजरा होत आहे. यानिमित्ताने नगरपरिषद, ऊरुस कमिटीच्यावतीने विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या काळातील सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उरुस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

उरुस काळात होणारे विविध कार्यक्रम पुढीलप्रमाणे- गुरुवार दि. 19 ऑक्टोबर रोजी रात्री 12 दुधगंगा जलाभिषेक व तत्पूर्वी रात्री 10 वा. हनुमान भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, शुक्रवार दि. 20 रोजी गंधरात्र व रात्री 10 वा. श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम, शनिवार दि. 21 रोजी पहिला गलेफ व रात्री 10 वा. चावडी येथे बालावधूत दत्तपंथी भजनी मंडळ (कुर्ली), रविवार दि. 22 रोजी दुसरा गलेफ व भक्तीगितांचा कार्यक्रम, सोमवार दि. 23 रोजी तिसरा गलेफ, भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीमंत राजे प्रविणसिंह घाटगे, श्रीमंत मृगेंद्रसिंह घाटगे, आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सकाळी 11 वा., रात्री 10 वाजता हिंदुराव घाटगे हायस्कूल पटांगणावर ‘रफी की यादे’ हा जुन्या हिंदी गितांचा कार्यक्रम.

मंगळवार दि. 24 रोजी चौथ गलेफ दुपारी 3 वा. छ. शाहू साखर कारखान्याच्यावतीने नेमलेल्या कुस्ती स्पर्धा कागल सिनिअर म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत. रात्री 9 वा. यशवंतराव घाटगे हायस्कूल पटांगणावर योगीता पाटील निर्मित ‘रात्र धुंदीत ही जागवा’ हा लावणी कार्यक्रम. रात्री 10 वाजता गैबी दर्गाह येथे कव्वाली जुगलबंदी, रात्री 10.30 वा. यशवंत किल्ला येथे रेखा पाटील यांचा लोकनाटय़ तमाशा, पहाटे आलासकर  फायर वर्क्सच्यावीतने गैबी चौक येथे भव्य आतषबाजी.

बुधवार दि. 25 रोजी पाचवा गलेफ, रात्री 10 वा. यशवंतराव घाटगे हायस्कूल पटांगणावर ऑर्केस्ट्रा गंधार. गुरुवार दि. 26 रोजी रात्री 9 वा. हिंदुराव घाटगे पटांगण येथे खास कागलवासियांसाठी उत्सवशाही मराठमोळा असा गीत राधाई हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमास आमदार हसन मुश्रीफ, युवराज पाटील, भैय्या माने, नविद मुश्रीफ, रमेश माळी, रशिदशेठ मुजावर, प्रकाश गाडेकर, एम. पी. पाटील, चंद्रकांत गवळी, शिवाजीराव गाडेकर, बॉबी माने, बाबगोंडा पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: