|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » औंध येथे वाळूच्या डंपरने घेतला एक जणाचा बळी

औंध येथे वाळूच्या डंपरने घेतला एक जणाचा बळी 

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी नागरिक, युवकांमधून तीव्र संताप

वार्ताहर / औंध

औंध परिसरात सुरू असलेल्या अवैध्य वाळू वाहतूक करणाया डंपरने येथीलथील केदार चौकामध्ये एक जणास उडविले असून पंचेचाळीस वर्षीय इसमाचा म्रूत्यु झाला . दरम्यान खुलेआम सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतूक प्रकरणी औंध ग्रामस्थ, युवकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

याबाबतची घटनास्थळावरून व औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी ,मागील काही दिवसांपासून भुरकवडी,अंबवडे,, कुरोली, वाकेश्वर,निमसोड येथील नदीपात्रातून वाळु उचलून औंध परिसरातून कोरेगाव, सातारा, कराड,सांगली जिल्हयातील कडेगाव तालुक्यात मोठय़ा प्रमाणात डंपरद्वारे अवैध्य वाळू वाहतूक सुरू आहे. पण याबाबत महसूल विभाग मूग गिळून गप्प आहे. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास औंध गावातून भरधाव वेगाने निघालेल्या एका अवैध्य वाळू वाहतूक करणाया डंपरने केदार चौक येथे ब्राम्हण गल्ली कडून आपले गावातील काम आटोपून  केदार चौकात येणाया दुचाकी वरील सोमनाथ आनंदा  सुर्यवंशी वय पंचेचाळीस यांना  या डंपरने भर चौकात उडविले. त्यावेळी चौकातील नागरिक, युवक त्याठिकाणी गोळा झाले त्यानंतर संबंधित डंपर व चालकाला त्याठिकाणी थांबविले. यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी गंभीर जखमी झाले.

यामध्ये दुचाकी गाडीचा चेंदामेंदा झाला. त्यानंतर सोमनाथ आनंदा सुर्यवंशी यांना औंध गावातील युवक, नागरिकांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले पण डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा उपचारापूर्वीच म्रूत्यु झाला.  दरम्यान औंध पोलीसांनी वाळूने भरलेला डंपर व ड्रायव्हर योगेश घोरपडे रा.तासगाव ता.जि.सातारा यास ताब्यात घेतले  या घटनेमुळे औंध येथे अवैध वाळू व्यावसायिकांविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या दुर्दैवी म्रूत्यु बद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमनाथ सुर्यवंशी हे अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचे होते. मागील काही वर्षे त्यांनी यात्रेतील फिरत्या  सिनेमा मध्ये आँपरेटर म्हणून काम केले होते पण या व्यवसायाला  उतरती कळा लागल्याने  सध्या औंध  येथे ते मोलमजुरी करून जीवन जगत होते. पण अचानक त्यांच्या झालेल्या म्रूत्युमुळे औंधसह परिसरात शोककळा पसरली असून  त्यांच्या. पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

 सोमनाथ सुर्यवंशी यांना ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी युवक, नागरिक, महिलांनी एकच गर्दी केली होती. त्यांचा म्रुत्यू झाल्याचे समजताच अनेकांना अश्रू अनावर झाले.

   अवैध वाळू वाहतूक करणाया मुजोर व्यावसायिकांना वाळूची वाहतूक करताना कशाचेही भान नसते. इप्सित साध्य करण्यासाठी  ते भरधाव वेगाने वाहन चालवित असताना वेळप्रसंगी मध्ये येणायानां चिरडण्यास देखील मागे पुढे पहात नाहीत त्यामुळे मुजोरखोर वाळू वाहतूक करणायाना लगाम घालणार तरी कोण असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे.